यूपीआय मोठी डिजिटल पेमेंट टेक्नोलॉजी
UPI payment : युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आज देशात सर्वात मोठी डिजिटल पेमेंट टेक्नोलॉजी बनली आहे. आपल्यापैकी बहुतेक जण आज यूपीआय वापरत असतात. म्हणजे अगदी एखाद्या छोट्या दुकानात चॉक्लेट खरेदी करत असाल किंवा ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करत असाल यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण अनेक वेळा यूपीआय पेमेंट अवशस्वी अर्थात फेल झाल्यामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. सतत यूपीआय करणाऱ्यांना आठवड्यातून एकदा तरी या यूपीआय पेमेंट फेल होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. अनेकदा यूपीआय पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे, आपण २-३ वेळा पैसे भरतो. अनेकवेळा ही रक्कम परत तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी वरच काळ लातो. त्यामळे आपली रक्क्म अडकून पडल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व प्रकियेत यूपीआयवरून पाठवलेली रक्कम ट्रॅन्जेक्शन होत नसल्याने तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी काही नवीन ट्रिक्स आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. या बातमीत आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही यूपीआय पेमेंट फेल होण्याच्या समस्येपासन मक्त होऊ शकता…
यूपीआय पेमेंट लिमिट
यूपीआय पेमेंट फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे यूपीआय पेमेंट लिमिट पूर्ण होणे हे आहे. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते.
म्हणजेच जर तुमची पेमेंट मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तरपेमेंट थांबवले जाऊ शकते आणि जर पैसे देणाऱ्याची मर्यादादेखील पूर्ण झाली असेल तेव्हा आपली रोख रक्क्म अडकून पडत असते. आपल्या बँकेच्या माध्यमातून केलेला ऑनलाईन व्यवहार सक्सेस न होण्यामागे बँक सर्व्हर मध्ये आलेली समस्या हा असतो. ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याही बँकेचा सर्व्हर एखाद्यावेळी काम करत नाही. तुम्हाला ही समस्या जाणवू नये यासाठी तुमची अन्य बँकेतील खाती तुम्ही यूपीआय आयडीशी जोडून ठेवायला असावी. जेणेकरून एखाद्या बँकेची लिंक काम करत नसेल दुसऱ्या बँक खात्यातुन तुम्हाला ऑनलाईन व्यवहार करता येतील. ऑनलाईन पैसे व्यवहार करण्यासाठी बँक खाते चेंज करून तुम्हाला ताबडतोब पेमेंट करता येईल.
यूपीआय पिनचा वापर काळजीपूर्व करा
नेहमी एक गोस्ट लक्षात ठेवा की यूपीआय पिनचा वापर काळजीपूर्व केला गेला पाहिजे. आपला पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे. तो कुणालाही सांगू नका. तसे केल्यास तुमची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.म्हणजे एका व्यक्तीची विविध बैंक खाती, सोशल मीडिया अकाऊंट्स, ऑफिस मेल,पर्सनल मेल या सर्वांमुळे पासवर्ड्सदेखील खूप होतात.त्यामुळे कधी कधी नेमका पासवर्ड लक्षात ठेवणं अवघड होतं. अशावेळी यूपीआय पेमेंट करतानाही अनेक वेळा आपण चुकीचा पिन टाकतो ज्यामुळे पेमेंट फेल होतं. त्यामुळे यूपीआयपिन टाकताना काळजी घेणं गरजेचं आहे.
वापरा यूपीआय लाइट
यूपीआय पेमेंट अयशस्वी होण्यामागे बँक सर्व्हर आणि नेटवर्क एक प्रमुख कारण आहे. एनपीसीआयने गेल्या वर्षी यूपीआय लाइट अँप लाँच केले आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला यासह लगेचच दोनशे रुपये इतकी रक्कम पाठविता येणार आहे. या पद्धतीने आपण दिवभरात एका दिवसात यूपीआय लाइट या अँप वापर करून जवळपास चार रकमेचा ऑनलाईन व्यवहार करू शकता. यूपीआय लाईटची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला पिनची गरज नाही आणि बँकेच्या सर्व्हरमध्ये कोणतीही समस्या असल्यासही पेमेंट होईल. तुम्ही ते गुगल पे आणि फोन पे अँप द्वारे देखील वापरू शकता.
पेमेंट करताना घाई करू नका
भारतात यूपीआय आधारित अॅप्समध्ये पेटीएम, फोन पे, गुगल पे खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या मदतीने, वापरकर्ते यूपीआय आयडी किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैशांचा व्यवहार करत असतात. पण या व्यवहारांत कधी-कधी वापरकर्ते घाईघाईने चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. अनेकदा अशावेळी आपले पैसे चुकीच्या अकाऊंटला जातात ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.