कधी सुरु होईल सुविधा
ST Bus App : एसटी प्रवाशांना गाड्यांचे आरक्षण सहज, सुलभ आणि विनाअडथळा करता यावे यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाइन ॲप प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा इबिस- कॅश कंपनीच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठी पाच वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. करारानुसार एसटी अधिकृत मोबाइल ॲप आणि वेबसाईट विकसित करणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे ॲपप्रवाशांना वापरता येणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आरक्षण ॲप प्रवाशांच्या सेवेत
आधुनिक युगात एसटी बससेवेत देखील स्थित्यंतरे घडवण्यासाठी महामंडळाने कंबर कसली आहे. डिजिटल युगात प्रवाशांना डिजिटल सुविधा देण्याकडे महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी लवकरच ऑनलाइन आरक्षण ॲप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. चुकीचा आसन क्रमांक येणे, आरक्षणासाठी गाडीचउपलब्ध नसणे, तिकीट आरक्षित न होता पैसे वजा होणे आणि त्याचा परतावा मिळवण्यासाठी हेलपाटे मारणे या आणि अशा अनेक त्रुटी अॅप आल्यानंतर दूर होणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या आरक्षण प्रणालीवरून आगाऊ आरक्षण करीत असताना प्रवाशांना अडचणी येणार नसल्याचेही महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.
ॲपमधून ऑनलाइन व्यवहार
तिकिटासाठीच्या ॲपवर गुगल पे, पेटीएम आणि अन्य मोबाईल ॲपच्या माध्यमाने पैसे भरण्याची सुविधा असणार आहे. यामुळे ऑनलाइन पैसे प्रवाशांना भरता येणार आहेत. सध्या रोख आणि क्रेडिट-डेबिट कार्डने पैर भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रवासी सुविधा ॲप डाऊनलोड केल्यानंत प्रवाशांना आरक्षित आसन क्रमांक, गाडीची माहिती, त्याचबरोबर गाडी कु आहे याची माहितीदेखील ॲपवर उपलब्ध होणार आहे.