Pradeep Kurulkar Honey Trap
वृत्तसंस्था : डीआरडीओचे संचालक, शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे तपासात समोर आले आहेत. डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी दोन महिलांवर अत्याचार केला असल्याचा आरोप राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल केलेल्या चार्ज शीट मध्ये करण्यात आला आहे. डॉ. प्रदीप कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी झारा दासगुप्ता हिच्या हनीट्रॅप मध्ये अडकून देशाच्या सुरक्षिततेबाबत महत्वाची माहिती सुद्धा तिला सांगितली असल्याचे समोर आले आहे.
आरोपपत्रात हे पुरावे
राष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी झारा दासगुप्ता यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांच्या न्यायालयात जवळपास 10 हजार 837 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. सरकारच्या दहशतवाद विरोधी टीमने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रासोबत पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी झारा दासगुप्ता यांच्यासोबत डॉ. प्रदीप कुरुलकरने केलेल्या सोशल मीडिया संवादाचे पुरावे सुद्धा जोडण्यात आले होते. या संभाषणातून धक्कादायक माहिती समोर आली, क्रुकाने झारासोबत अग्नी, ब्रह्मोस, रुस्तम क्षेपणास्त्रांवर चर्चा केली, अशी धक्कादायक माहिती सुद्धा यात नमूद आहे.
दोन महिलांचे शोषण
डीआरडीओमध्ये नोकरी मिळवण्यासाठी कुरुकाने दोन महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप सुद्धा चार्जशीट मध्ये करण्यात आला आहे. डॉ. प्रदीप कुरुलकरला अटक केल्यानंतर तपासादरम्यान अनेक प्रकार समोर आले आहेत. एटीएसच्या पथकाने दोन महिलांकडे चौकशी केली असता डॉ. प्रदीप कुरुलकरने दोन महिलांना नोकरीचे आमिष दाखविले होते. डीआरडीओ मध्ये त्यांना बोलावून आपल्या जाळ्यात अडकवले. एटीएसच्या पथकाने या महिलांचे जबाब नोंदवले आहेत. जवळपास सहा महिलांना त्याने कामे देण्याचा बहाणा करून डीआरडीओच्या मुंबईस्थित गेस्ट हाऊसमध्ये बोलावले होते, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद आहे. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात डॉ. प्रदीप कुरुलकरने दोन महिलांचे शोषण केल्याचा दावा केला आहे.
असा होती चॅटिंग
पाकिस्तानी महिला : ब्राह्मोसचे किती व्हर्जन मोडिफाइड करण्यात आलेली आहेत?
डॉ. प्रदीप कुरुलकर : मला वाटते खूप आहेत. त्यातील बरीचशी उपकरणे ही माझ्या आस्थापनेमधील असतील.
पाकिस्तानी महिला : बेब, तुझ्या मते डिझाइन रिपोर्ट कसा असेल?
डॉ. प्रदीप कुरुलकर : बेब, ही माहिती खूप संवेदनशील आहे. मी तुला कॉपी व्हॉटसअँप किंवा मेलवर पाठवू शकणार नाही. मी ती हस्तगत करून ठेवतो आणि तू इथे आल्यास मी तुला ती माहिती दाखवतो…’
हा संवाद अत्यंत धक्कादायक असा असून आहे, संशोधन व विकास संस्थेच्या डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी देशासोबत मोठा द्रोह केला आहे. आणि पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखवण्याची तयारी तो करीत असल्याचे ,या सर्व व्हॉट्सअप चॅटिंगमधून स्पष्ट होत आहे.
चार्जशीट मध्ये दोघांमधील सविस्तर संवाद
झारा दासगुप्ता हिने डॉ प्रदीप कुरुलकरला आपण यूकेमधील सॉफ्टवेअर अभियंता आहे, अशी ओळख करून दिली. मग अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून त्यांच्याशी मैत्री जुळवली. . तेव्हापासून ते दोघे जून ते डिसेंबर २०२२ पर्यंत संपर्कात होते. मात्र, त्यानंतर डॉ. कुरुलकरला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असावे; कारण फेब्रुवारी २०२३ मध्ये कुरुलकरने झाराचा नंबर ब्लॉक केला होता. कुरुलकरला तिने अज्ञात नंबरवरून माझा मला न का ब्लॉक असे विचारले होते. असेही चार्जशीट मध्ये नमूद आहे. तसेच दोघांमधील सविस्तर संवाद तसेच पाकिस्तानी महिलेस डॉ. प्रदीप कुरुलकरने दिलेली अत्यंत गोपनीय माहिती सुद्धा नमूद आहे.