Monsoon update in maharashtra : अखेर जुलै महिन्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. एक महिना उशिराने दाखल झालेला पाऊस आता दमदार बरसत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची जबरदस्त एंट्री झाली. आजवरचे सर्व अंदाज फेल गेले असले तरी हवामान विभागाच्या वतीने वर्तविल्या गेलेला जुलै महिन्याचा अंदाज खरा उतरत आहे. दरम्यान जुलै महिन्यात पाऊस कसा राहील याबाबतचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. तर आपण या बातमीत जाणून घेणार आहोत की, पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांचा जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज कसा आहे.
पेरणीची लगबग सुरु
यंदा चक्री वादळाने मान्सूनची वाट अडविली. जूनच्या पहिल्या सप्ताहात दाखल होणारा मान्सून खूप उशिराने अर्थात २५ जूनच्या आसपास राज्यात दाखल झाला. तरी सुद्धा मुबई आणि पुणे वगळता कोठेही पावसाच्या सरी बरसल्या नव्हत्या. अखेर आता ही प्रतीक्षा संपली. दोन दिवसांपासून पावसाचा रोज चांगलाच वाढला असून राज्यात बहुतांश भागात दमदार पावसाचे आगमन झाले आहे. यावर्षी पाऊस लांबला म्हणून पेरण्या थांबल्या होत्या. आता पुन्हा पेरणीची लगबग दिसून येत आहे. खरेतर, जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, जुलैमध्येही पाऊस कमी पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, आता पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
काय म्हणतात डख
राज्यात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडेल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. जुलैमध्ये जूनपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे त्यांनी नमूद केले. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत जुलैपेक्षा जास्त पाऊस पडेल असेही ते म्हणाले. 8 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची त्यांना अपेक्षा आहे आणि या कालावधीत राज्यातील बहुतांश शेतकरी पेरणी पूर्ण करतील असाही त्यांना आशा आहे.ज्या भागात 8 जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही, तेथे 13 जुलै ते 17 जुलै दरम्यान जोरदार पाऊस पडेल, असेही ते म्हणाले. राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार असून, राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, 13 ते 17 जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागात पावसाची अपेक्षा आहे.
कोठे पडले पाऊस
monsoon update in maharashtra : जून खाली गेला मात्र जुलै नाराज करणार नाही, असे एकंदरीत भाकीत पंजाब डख यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय जून महिन्यात येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या समाधानाचे वातावरण आहे. जूनमध्ये दमदार होत असलेल्या पावसाने पेरणी व शेतीच्या कामांनी वेग पकडला असून येथील शेतकऱ्यांच्या व्यस्ततेत भर पडली.राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जुमध्ये पाऊस पडेल, असे पंजाब डख सांगतात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटांवर पाऊस कोसळला आहे. आता राज्याच्या इतर भागातही पाऊस अपेक्षित आहे.