Mercedes Benz SL 554 MATIC:मर्सिडीजबेंझ हे नाव घेताच एक डँशिंग कारचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते.
आता या कारचे नवीन वर्जन भारतीय बाजार पेठेत दाखल झाले आहे. Mercedes Benz SL 554 MATIC बद्दल
सविस्तर माहिती या बातमीत आम्ही तुम्हाला देणार आहोत.
किती आहे किंमत
जगातील काही प्रतिष्ठित अशा वाहनांपैकी एक मर्सिडीज बेंझ एसएल ५५४ मॅटिक प्लस ही कार भारतात सादर करण्यात आली आहे. मर्सिडीज बेंझ एसएलच्या निर्मिती प्रवास हा रेसिंग कारपासून ओपन-टॉप लक्झरी स्पोर्ट्स कारपर्यंत आहे. एसएल ५५ चा हा प्रवास काही दशकांचा आहे व आता एसएल रोडस्टर ही तिच्या सातव्या पिढीमध्ये आहे. या एसएल ५५ ची किंमत २.३५ कोटी रुपये आहे.
लक्झरी व अप्रतिम डिझाईन
यावेळी मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर म्हणाले की, एसएल रोडस्टर भारतात सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. इतिहासात प्रथमच एसएल पूर्णपणे मर्सिडीज-एएमजीने अफलटरबॅचमध्ये विकसित केली आहे. जी एक रोडस्टर ऑफर करते व जोडीला परफॉर्मन्स लक्झरी व अप्रतिम डिझाईन ही प्रदान करते. मर्सिडीज बेंझ एसएल ही एक प्रतिष्ठित व टाइमलेसनेसचा उत्कृष्ट उदाहरण आहे. गेल्या सात दशकांपासून ऑटोमोटिव्ह क्षेत्रात मर्सिडीज बेंझ एसएलबद्दलचे वलय व प्रतिष्ठा अबाधित आहे.
खास वैशिष्ट्ये जाणून घ्या
आता आपण Mercedes Benz SL 554 MATIC या कारची काही खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. ही वैशिष्टये अन्य कारच्या तुलनेत तुम्हाला अधिक पसंत पडतील अशी आहेत. मर्सिडीज बेंझ एसएल ५५४ मॅटिक प्लसमध्ये ४.० लिटर व्ही ८ बिटर्बो इंजिन आहे, जे ३५० किलोवॅट (४७६ एचपी)च्या शक्तीची निर्मिती करते. तसेच ७०० एनएम टॉर्कची निर्मितीही करते. एसएल ५५ ही शून्य ते शंभरचा वेग हा फक्त ३.९ सेकंदात गाठते. तर या कारचा कमाल वेग हा ताशी २९५ किमी इतका आहे