How to keep wifi secure
माहिती, कामकाज आणि मनोरंजन यासाठी आजच्या युगात इंटरनेट हा एकदम चांगला आणि सोयीस्कर मार्ग आहे. आजकाल घरोघरी वायफाय कनेक्शन आलं आहे. पण आपण वापरत असलेलं आपलं कनेक्शन किती सिक्युअर्ड आहे, याचा कधी विचार केला आहे का? तर घरचं वायफाय नेटवर्क सिक्युअर करण्यासाठी काही खास टीप्स तुम्ही फॉलो करू शकता.
इंटरनेट कनेक्शन सुरक्षित हवं
आजकाल इंटरनेट फक्त मनोरंजनाची नाही तर फार गरजेची गोष्ट बनली आहे. आजकाल इंटरनेटशिवाय जीवनाची कल्पना करणंही अवघड आहे. म्हणजेऑनलाइन शिक्षणापासून ते ऑफिसचं काम वर्क फ्रॉम होम झाल्यापासून घरोघरी इंटरनेट सेवा आली आहे. त्यामुळेच आजकाल सर्वांच्या घरामध्ये वायफाय मिळत आहे. घरातील सर्व गॅझेट्स जसे की लॅपटॉप, स्मार्टफोन, टीव्ही, अमेझॉन अलेक्सा आणि इतर प्रोडक्ट्स वायफायशी कनेक्ट असतात. तुमचा संपूर्ण महत्त्वाचा डेटा यामध्ये असतो, त्यामुळे आपलं इंटरनेट कनेक्शन सुरक्षित असणंही गरजेचं आहे.
वायफाय सुरक्षित आहे का?
तर तुमचं वायफाय सुरक्षित आहे का? आणि ते सुरक्षित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, यासाठी आम्ही काही खास टीप्स आज सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे वायफाय कनेक्शन सुरक्षित करू शकता. आपल्या होम नेटवर्कचे नाव आणि पासवर्ड हा डीफॉल्ट राहणार नाही याची काळजी घ्या. . नेटवर्कचे नाव बदलण्यासाठी, प्रथम विंडोज कमांड प्रॉम्प्टवर जा, येथे “ipconfig” टाइप करा आणि नंतर इंटरनेट ब्राऊझरवर जा आणि तुमचा आयपी ॲड्रेस शोधा. त्यानंतर तुमच्या राऊटरचे लॉगिन क्रेडेंशियल एंटर करा आणि वायफाय सेटिंग उघडा आणि एसएसआयडी आणि पासवर्ड बदला. तुमचे वायफाय कनेक्शन बाबतची माहिती तसेच वायफाय क्रेडेन्शियल्स तुमच्या अनोखळी लोकांना कधीही सांगू नका. शक्यतो ही माहिती फक्त तुमच्याकडे असू द्या.
काळजीपूर्वक इंटरनेट वापरा
तुम्हाला जबरदस्ती एखाद्याला काही वेळासाठी वायफाय द्यावं लागलं तरीही तुम्ही गेस्ट नेटवर्क तयार करू शकता, जेणेकरून तुमच्या प्राथमिक वायफायशी कनेक्ट केलेल्या उपकरणांची माहिती चालू ठेवा. याचा फायदा असा तिसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. वायफाय एन्क्रिप्शन होईल की वायरलेस चॅनल आणि डिव्हाइस दरम्यान शेअर केलेला डेटा एनक्रिप्टेड राहील. जेव्हा तुम्ही वायफाय वापरत नसाल किंवा घराबाहेर जात असाल तेव्हा ते बंद करा, जेणेकरून कोणीही नेटवर्कमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुमच्या वायफाय नेटवर्कचे फर्मवेअर त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून नियमितपणे डाऊनलोड करत राहा. इंटरनेटचा वापर कायमच काळजीपूर्वक करा, कारण तुमचा एक चुकीचा क्लिक तुमचा डेटा किंवा पैशांची खासगी माहिती इतरांना देऊ शकतो.
या बाबी नक्की तपासा
तुमच्या घराचे वाय-फायचे डीफॉल्ट नाव बदला.
तुमचा वायरलेस नेटवर्क पासवर्ड अद्वितीय आणि मजबूत बनवा.
नेटवर्क एन्क्रिप्शन सक्षम करा.
नेटवर्क नाव प्रसारण बंद करा.
तुमच्या राउटरचे सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा.
तुमच्याकडे चांगली फायरवॉल असल्याची खात्री करा.
तुमच्या नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी VPNs वापरा.