Career as a dubbing artist
चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांमध्ये ‘व्हॉईस ओव्हर’ म्हणजेच डबिंगचीप्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. यामध्ये डबिंग आर्टिस्ट मोलाची भूमिका बजावतात. त्यांना पडद्यावरील प्रसंगांनुसार त्या पात्रांना आवाज द्यायचा असतो. प्रसंगामध्ये संबंधित पात्र काय सांगू इच्छित आहे, त्याच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊन त्याप्रमाणे त्या पात्राचे संवाद अन्य भाषांमध्ये म्हणायचे असतात. dubbing artist jobs ही करिअरची संधी आहे.
कलाकारांचे संवाद डबिंग
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमचा आवाज कसा आहे, याला मोठे महत्त्व आहे. चित्रपट अथवा माहितीपटाचे डबिंग करताना आवाजातील आवश्यक तो भाग ध्वनीमुद्रित केला जातो व आवाजातील अनावश्यक भाग वगळला जातो. अशा कार्यक्रमांचे चित्रीकरण आधीच करण्यात येते. त्यानंतर त्यामधील पात्रांचे संवाद ध्वनीमुद्रित केले जातात. डबिंग करताना एखाद्या चांगल्या अभिनेत्याची मदत घेतली जाते. बहुतेक सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री आपले संवाद स्वतःच ध्वनीमुद्रित करण्याला पसंती देतात; मात्र काही वेळा चित्रपटातील प्रसंगाला अनुरूप अशा भावनेमध्ये संवाद म्हणणे काही अभिनेते, अभिनेत्रींना जमत नाही. अनेक अभिनेत्यांना-अभिनेत्रींना अशा वेळी भाषेची समस्याही जाणवते. अशा प्रसंगात या कलाकारांचे संवाद डबिंग कलाकाराकडून ध्वनीमुद्रित करून घेतले जातात.व्हॉईस ओव्हर या प्रकारामध्ये त्या प्रसंगाची पटकथा वाचून आवाज द्यावा लागतो. असे व्हिडिओ फिल्म, रेडिओवरील जाहिराती, माहितीपट हे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. बाजारात सध्या अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाले आहेत. हे सॉफ्टवेअर्स हिंदी भाषेत तयार करण्यात आले आहेत. अशा सॉफ्टवेअरचे अन्य भाषांमध्ये रुपांतर करण्यासाठी व्हॉईस ओव्हर तंत्राची मदत घेतली जाते.
अनुभव हाच मोठा गुरू
या तंत्रात डबिंग कलाकाराला फारसे कौशल्य दाखवावे लागत नाही; मात्र ॲनिमेशन चित्रपट आणि हॉलीवूड चित्रपटांचे हिंदी अथवा अन्य भारतीय भाषांमधील रुपांतरण करताना डबिंगची आवश्यकता भासते. ॲनिमेशन चित्रपटातील पात्रांचे वय, त्यांची व्यक्तिरेखा या अनुषंगाने आवाज काढणे आवश्यक असते. हॉलीवूड चित्रपटातील इंग्रजी पात्रांच्या संवादफेकी दरम्यान होणाऱ्या ओठांच्या हालचालींनुसार डबिंग करणाऱ्याने संवादफेक करणे गरजेचे असते.डबिंग कलाकार बनण्यासाठी संबंधिताकडे काही विशेष पात्रता असावी, असे मानलेजात नाही. मात्र बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रवेश करता येऊ शकतो. डबिंग करताना ज्या तांत्रिक गोष्टींचे भान ठेवावे लागते, त्याची जाण कलाकारांना असली पाहिजे. डबिंग कसे करावे याचे पाहिजे. डबिंग कसे करावे याचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम देशात उपलब्ध आहेत; मात्र या क्षेत्रात प्रवेश केल्यावर अनुभव हाच मोठा गुरू असतो, हे लक्षात ठेवावे.
पार्ट टाईम करिअर
डबिंग कलाकार म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काही व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. भाषेवर प्रभुत्त्व असणे आवश्यक आहे. सतत नवे शिकण्याची वृत्ती, संगणकापुढे बसून तासनतास काम करण्याची सवय, शब्दांचा योग्य उच्चार करण्याची क्षमता, वेळेत काम पूर्ण करण्याचे कसब आणि सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे यासंबंधीचे तंत्रज्ञान माहिती करून घेण्याची वृत्ती असणे आवश्यक असते. डबिंग असिस्टंट म्हणून तुम्हाला ऑडिओ पोस्ट प्रॉडक्शन हाउसमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अशा ठिकाणी आवाज बदलणे, ध्वनीमुद्रित संवादात वेगवेगळ्या आवाजांचे मिश्रण करणे यांसारखी कामे केली जातात. पार्ट टाईम करिअर म्हणूनही डबिंगचा पर्याय निवडू शकता. तसेच हे काम कलाकारांना फ्रीलान्स तत्त्वावरही करता येते. पर्याय निवडू शकता. तसेच हे काम कलाकारांना फ्रीलान्स तत्वावरही करता येते. या क्षेत्रात तुमचा चांगला संपर्क असावा लागतो.या क्षेत्रातील तांत्रिक तज्ज्ञ, कलाकार, डबिंगचा अनुभव असलेल्या व्यक्ती यांच्याशी तुम्ही नियमित संपर्क ठेवणे आवश्यक असते.