Apps Developer
आजच्या काळात मोबाईलच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली असून करिअरच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. आपल्या मोबाईलमध्ये अनेक अँप्स असतात. आपण अँप्स डेव्हलपर बनून चांगले करिअर घडवू शकता. या क्षेत्रात तुम्हालाचांगला पगार मिळवता येतो. या बातमीत आपण अँप्स डेव्हलपर बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत..मोबाईल, टॅब्लेट, स्मार्ट वॉचेस, डिजिटल असिस्टंटस् यांसारख्या डिव्हायसेससाठी अँप्लिकेशन सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला अँप्स डेव्हलपमेंट असे म्हणतात. संगणकावर काम करणारी सॉफ्टवेअर तयार केली जातात त्याचपद्धतीने ही अँप्स तयार केली जातात. मात्र संगणकाची सॉफ्टवेअर आणि मोबाइल ॲप्स यात फरक असतो. संगणकाच्या तुलनेत छोटा स्क्रिन, कमी मेमरी, कमी प्रोसेसिंग पॉवर, अशा मोबाईलसाठी ॲप्स तयार करायचे असतात.
अँप्सद्वारे अत्याधुनिक सुविधा
अँप्समुळे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. त्यांना या अँप्सद्वारे अनेक अत्याधुनिक सुविधा क्षणार्धात मिळू लागल्या आहेत. शॉपिंग, अन्य सेवा यांसाठी अँप्सचा मुबलक प्रमाणात वापर होतो आहे. ही ॲप्स मोबाईलची निर्मिती होत असतानाच त्यात इन्स्टॉल केली जातात अथवा स्मार्ट फोनधारकाकडून नंतर ती अँप्स डाउनलोड केली जातात. ॲप्स डेव्हलपर होण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाची पदवी असणे आवश्यक आहे. अँप्स डेव्हलपमेंटसाठीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. अनेक खासगी संस्था ॲप्स डेव्हलपमेंटचा डिप्लोमा अभ्यासक्रम चालवीत आहेत. सी, सी+ यासारख्या प्रोग्रामिंग भाषा शिकणे आवश्यक आहे. अँप्स डेव्हलपरला सर्वात प्रथम आपल्या उत्पादनाच्या दर्जाकडेलक्ष द्यावे लागते. स्क्रिनचे वेगवेगळे साईंज, कनेक्शनचा प्रकार, डिव्हाईस ऑपरेटिंग सिस्टीम अशा अनेक गोष्टींचा विचार डेव्हलपरला करावा लागतो.
नोकरीमध्ये घेण्यास प्राधान्य
आपण तयार केलेले अँप्स वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाइलवर चालले पाहिजेत, याकडेही डेव्हलपरला लक्ष द्यावे लागते. अँप्समध्ये वेळोवेळी सुधारणा कराव्या लागतात. असे करताना डेव्हलपरला ग्राहकांच्या गरजाही लक्षात घ्याव्या लागतात. तसेच अॅपची सुरक्षा विसरून चालत नाही.मोबाईल ॲप्सची बाजारपेठ अत्यंत वेगानेवाढू लागली आहे. उद्योग, व्यावसायिक, संस्था यांच्याकडनही योजना आखण्यासाठी. धोरण ठरवण्यासाठी अँप्सचा वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या कुशल अँप्स डेव्हलपर्सना नोकरीमध्ये घेऊ लागले आहेत. जी मंडळी स्वतःच अँप डेव्हलप करत आहेत, त्या मंडळींना नोकरीमध्ये घेण्यास प्राधान्य दिले जात आहे.
अँप्स डेव्हलपरची मागणी
अँप्स डेव्हलपरला नोकरीच्या सुरूवातीच्या काळात तीन ते पाच लाख एवढे वार्षिक वेतन मिळते. भारतात आयफोन, आयपॅड किंवा अँप्ण्ड्रॉईड डिव्हाइसच्या अँप्स डेव्हलपरची संख्या वाढण्यास बराच वाव आहे. मोबाइल अँप्सचे विश्व प्रचंड विस्तारणारे आहे. त्यामुळेच आगामी काही वर्षात अँप्स डेव्हलपरची मागणी वाढतच जाणार आहे. बाजारपेठेतील ही स्थिती लक्षात घेऊन युवकांनी अँप्स डेव्हलपर या क्षेत्राचा करिअर म्हणून गंभीरपणे विचार करण्यास काहीच हरकत नाही.