Alcohol diseases : दारू पिण्याची सवय शारीसाठी अत्यंत अपायकारक आहे. दारूच्या व्यसनाने तुमचा अकाली मृत्यू होऊ शकतो. तुम्हाला दारूचे व्यसन असेल तर ही बातमी नक्की वाचा…
दारू आणि लिव्हर
दारू आणि लिव्हर यांचा तसा जुना संबंध आहे. दारू केवळ लिव्हरलाच लक्ष्य करते की इतर अवयवांनाही त्यामुळे नुकसान होते ? लिव्हर हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तसा शरीरातला प्रत्येक अवयव महत्त्वाचाच असतो. कारण त्यांना वेगवेगळी कामे वाटून दिलेली असतात ! अनेकांना दारूचे व्यसन असते, त्यामुळे पुढे आयुष्यात त्यांना लिव्हरशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या नको असतील तर दारू न पिणेच चांगले. पण पिनेवालों को बहाना चाहिए! मग शरीरातील अवयव निकामी का होईना… त्याशिवाय त्यांना करमत नाही ! सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जे काही आपण खातो ते आपल्या लिव्हरपर्यंतही पोहोचते. या लिव्हरमध्येच व्हिटॅमिन आणि हार्मोनच्या रिसायकलिंगचे काम होत असते. तसेच लिव्हर आपल्या शरीरातील हानीकारक तत्त्वांना पूर्णपणे साफ करत असते. लिव्हरची एक खासियत असते ती म्हणजे आपण जेवण केल्यानंतर एक्स्ट्रा शुगरला ते स्वतःजवळ ठेवते आणि जेव्हाही शरीरात अशक्तपणा जाणवतो तेव्हा ते ग्लुकोज देते.
हे गंभीर आजार होतात
उच्च रक्तदाब
हृदयविकार
पक्षाघात
फुफ्फुसाच्या समस्या
यकृताचे आजार आणि पचनाच्या समस्य
स्तन, तोंड, घसा, अन्ननलिका, व्हॉइस बॉक्स, यकृत, कोलन आणि गुदाशय यांचा कर्करोग
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे,
आजारी पडण्याची शक्यता वाढते
डिमेंशिया आणि खराब शालेय कामगिरी आणि स्मरणशक्ती समस्या.
काळजी कशी घ्यावी?
दारू, तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहावे.
पित्तशामक, योग्य आहार घ्यावा.
पचायला हलका असणारा आहार नेहमीच आवश्यक असतो.
पुरेशी झोप घ्यावी.
तेलकट-तूपकट पदार्थ टाळावेत.
मानसिक ताणतणावापासून दूर राहावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम नियमित करायलाच हवा.
वेळीच दारू सोडली तर आजारांवर मात
दारूचा एक घोटही शरीराला नुकसान पोहोचवू शकतो. दारू पोटात गेल्यानंतर ती गॅस्ट्रीक ॲसिडला त्रास देते. जर गरजेपेक्षा जास्त दारू प्यायल्यामुळे पोटावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. लिव्हर हे नेहमी शरीराला आतून स्वच्छ अर्थात डिटॉक्सिफाय करते. मात्र जर काही लोक वारंवार दारू पितात त्यांच्या लिव्हरमध्ये दारू साठली जाते. कारण लिव्हर त्याला फॅट समजते आणि हेच महत्त्वाचे कारण आहे. ज्यामुळे दारूचा लिव्हरवर परिणाम होतो व ते खराब होते.मात्र केवळ ते लिव्हरलाच लक्ष्य करते असे नाही तर दारू शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम करत असते. मात्र वेळीच दारू सोडली तर घेतलेल्या अनेक आजारांवर सहज मात करता येईल. दारूमुळे अनेक गंभीर आजार होतात. दारू सोडणे सोपी आहे. तुम्ही तशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे.