Adipurusha : ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप ‘की’ हा संवाद बॉलीवूडमधील एखाद्या टपोरी मसालापटातील वाटेल, परंतु तो आहे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील, तोही हनुमंतांच्या मुखातील. असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाच्या मुखात अशा प्रकारची अत्यंत खालच्या प्रतीची, ‘छपरी’ भाषा देण्यात आल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दूरदर्शनवरील ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांनी ‘अत्यंत लज्जास्पद’ अशा शब्दांत या प्रकाराची निर्भत्सना केली आहे, तर याप्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संवाद लेखक या दोघांनीही राष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.
अनेकांनी उठवली टीकेची झोड
सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे, तर मनोज मुंतशिर शुक्ला यांनी संवादलेखन केले आहे.प्रभास, सैफ अली खान, अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी यात अभिनय केला आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित झाला, तेव्हापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यात रावणाची प्रतिमा ज्या पद्धतीने उभी केली होती, त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता या चित्रपटातील संवादांवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. हिंदी मसाला चित्रपटांतील टपोरी पात्रे ज्या प्रकारची भाषा बोलतात, तसे संवाद यातील धार्मिक पात्रांच्या तोंडी घालण्यात आले आहेत. ते कालसापेक्ष तर नाहीतच, परंतु त्यातून त्या पात्रांना दर्जाहीनता येत असल्याचे सर्वसामान्य प्रेक्षकांचेही मत आहे. समाजमाध्यमांतून अनेकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे.
भारतीयांच्या भावना दुखावल्या?
ठाकरे शिवसेना राज्यसभा सदस्य प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले त् आहे की, आपण ज्यांची पूजा करतो अशा श्रद्धेय देवतांच्या तोंडी मनोरंजनाच्या नावाखाली असे दिग्दर्शक आणि संवाद लेखक यांनी सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या खालच्या प्रतीचे संवाद देऊन चित्रपटाचे आणि लेखक यांनी सर्व भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांवर चित्रपट काढायचा आणि त्यात अशा प्रकारे मर्यादाभंग करायचा, हे चालवून घेतले जाणार नाही.’रामायण’ मालिकेतील अभिनेते सुनील लाहिरी यांनीही या प्रकारावरून संताप व्यक्त केला आहे. ‘हा चित्रपट ‘रामायण’ समोर ठेवून काढला आहे, असे सांगण्यात येते. ते खरे असेल तर त्यात अशा प्रकारच्या भाषेचा वापर करणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या चित्रपटातील केवळ भाषाच नव्हे, तर अन्य बाबींवरही टीकेचा शरवर्षाव होताना दिसत आहे.
लेखक म्हणतात ही कथनाची परंपरा
आपल्याकडे रामायण पठणाची आणि गावातून आलो आहे. आमच्याकडे (हनुमानाच्या मुखातील) या विशिष्ट वापरणारा मी एकटाच नाही, अशा शब्दांत संवाद लेखक मनोज शुक्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रपटातील भाषेचे समर्थन केले. कथनाची परंपरा आहे. मी एका छोट्या आजी जेव्हा रामायण ऐकवायची तेव्हा अशाच भाषेचा उपयोग करायची.संवादाबाबत बोलायचे, तर या देशातील संतांनी, कथावाचकांनाही अगदी अशीच भाषा वापरलेली आहे. ही भाषा वापरणारा मी एकटाच नाही, अशा शब्दांत संवाद लेखक मनोज शुक्ला यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रपटातील भाषेचे समर्थन केले
पहिल्याच दिवशी १४० कोटी कमाई
चित्रपट रसिकांकडून रामायणाच्या कथानकावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ ने बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडून काढत पहिल्याच दिवशी १४० कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट निर्मात्यांनी शनिवारी दिली. देशातच नाही, तर या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवरही नवा विक्रम केला आहे. तेलुगूसह हिंदी भाषेतूनही या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.’आदिपुरुष’ने आतापर्यंत बनवलेल्या सर्व हिंदी भाषेतील चित्रपटांचा विक्रम मोडत अखिल भारतीय स्तरावर सर्वाधिक कमाई केली आहे. जागतिक स्तरावर प्रेक्षकांची मने जिंकून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी विक्रमी १४० कोटींची कमाई केली असल्याचे या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या टी सिरीज कंपनीने म्हटले आहे.
शुक्रवारी देशभर प्रदर्शित
दिग्दर्शक ओम राऊत असलेला हा चित्रपट ‘आदिपुरुष’ देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असून हा चित्रपट हा रामायणावर आधारित आहे. तो शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास राघव (राम), जानकी (सीता) च्या भूमिकेत क्रीती सेनॉन आणि लंकेश (रावण)च्या भूमिकेत सैफ अली खान आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईबाबतीत ‘आदिपुरुष’ ने हतिक रोशनचा ‘वॉर’, रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि शाहरूख खानच्या ‘पठाण’सारख्या चित्रपटांच्या क्रमवारीत आला असल्याचा दावा चित्रपट निर्मात्यांनी केला आहे.