Gypsy in Tadoba : देश-विदेशात पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत निसर्ग पर्यटनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जिप्सीचे स्टेअरिंग पुरुषांच्या हातात आहे. (A woman driver on a gypsy in Tadoba )येत्या काही दिवसात ताडोबाच्या बफर व कोअर झोन परिसरात जिप्सी चालविताना महिला दिसून येणार आहेत. येणार आहेत . याकरिता ताडोबा व्यवस्थापनाने ताडोबाच्या बफर क्षेत्रात वसलेल्या गावातील आदिवासी महिलांना जिप्सी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पामध्ये महिला प्रथमच जिप्सी चालविताना दिसणार आहे.
जिप्सीवर प्रथमच महिला चालक
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ओळख जगात आहे. त्यामुळे पर्यटक वाघांच्या दर्शनाकरिता आवर्जून दरवर्षी येतात. या ठिकाणी सध्या कोअर आणि बफर झोनमध्ये होत असलेल्या निसर्ग पर्यटनात सर्व जिप्सींचे स्टेअरिंग फक्त पुरुषांच्या हातात आहे. काही स्थानिक तर काही बाहेरच्या जिप्सी या ठिकाणी पर्यटकांना भ्रमंती करवून खांदा लावून ताडोबातील जिप्सीचे स्टेअरिंग महिलांच्या हातात देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
ताडोबा परिसरातील महिलांना संधी
आता पुरुषांच्या खांद्याला या उपक्रमांतर्गत बफर क्षेत्रातील आणि विशेषतः कोअर क्षेत्राच्या अगदी जवळच्या गावातील १८ ते ३५ वयोगटातील युवती व महिलांकरिता चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचा शुभारंभ २५ जून रोजी खुटवंडा गावामध्ये पार पडला. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या संकल्पनेतून आणि उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम होणार आहे. ताडोबा जंगल परिसरातील खुटवंडा, घोसरी व सीताराम पेठ या गावच्या तरुणी युवती, महिला, गावकरी, वन विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती विविध टप्यात हा उपक्रम खुटवंडा, घोसरी व सीतारामपेठ या गावांचा समावेश आहे.
महिनाभरात महिलांना प्रशिक्षण
ताडोबा परिसरातील महिलांना हा एक चांगला रोजगार निर्माण होईल. उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात कोलारा, सातारा, बाम्हणगाव, भामडेळी, कोंडेगाव व मोहली येथील महिलांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील पहिल्या टप्यात जिप्सी वाहन प्रशिक्षणाकरिता युवती व महिलांचे ८४ अर्ज वनविभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ६१ आदिवासी महिलांचा सहभाग आहे. महिलांना जिप्सी वाहनाचे महिनाभरात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन भरारी उपक्रमांतर्गत लर्निंग व पक्के लायसन्स काढून देण्यात येणार आहे.
ताडोबा पर्यटकांना सुविधा
महिलांच्या प्रशिक्षणावर होणारा खर्च ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान उचालणार आहे. महिलांच्या हातात जिप्सीचे स्टेअरिंग देण्याकरीता सर्वप्रथम गावामध्ये महिलांसोबत चर्चासत्र, बैठक घेऊन वाहन चालविण्याविषयी महत्व व फायदे सांगण्यात आले. स्थानिक युवती व महिलांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जिप्सी वाहन चालक म्हणून कार्य करणे, शासकीय- निमशासकीय सेवेमध्ये या प्रशिक्षणाचा लाभ घेणे तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात विविध रिसोर्ट आहेत. या ठिकाणी थांबणाऱ्या पर्यटकांना (A woman driver on a gypsy in Tadoba ) वाहन चालक म्हणून सुविधा या उपक्रमाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.