लक्ष्मीनारायण संस्थेचे फार्मसी कॉलेज
Pharmacy College Khamgaon : लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ फार्मसीला फार्मसी कॅाउंन्सील नवी दिल्लीची शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून मान्यता मिळाली आहे. खामगाव शहरात प्रथमच फार्मसी कॉलेजला मान्यता मिळाली असल्यामुळे लक्ष्मीनारायण गृप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अँड कॉलेजेसच्या शिरपेचात एक नवीन मानाचा तुरा रोवला गेला आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून फार्मसी कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. आमच्या कॉलेजची विशेषतः अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद, निसर्गरम्य परिसर, वाय – फायची विशेष सुविधा तसेच उत्कृष्ट उपहार गृह या सह बस स्थानक ते विद्यालय मोफत बस सेवा उपलब्ध राहील.
प्रथम फार्मसी कॉलेज
फार्मसी या अभ्यासक्रमा द्वारे आपण स्वतंत्र रोजगार , खाजगी तसेच सरकारी नोकरीसह आपले जीवन सुकर, समृद्ध करू शकता. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मुंबई तसेच तंत्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य सलंग्नीत असणार आहे. गेली पंधरा वर्षापासून लक्ष्मीनारायण गृप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अॅन्ड कॉलेजेसच्या माध्यमातून निरंतरता पूर्वक विविध अभ्यासक्रम आणण्याची जिज्ञासा बाळगून अविरत प्रयत्न करणारे आणि आपले कार्य भगीरथ प्रयत्नाने पूर्णत्वास नेणारे लक्ष्मीनारायण गृपचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान तसेच संचालिका राजकुमारी चौहान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. हे खामगाव शहरातील प्रथम फार्मसी कॉलेज ठरणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक दालन
खऱ्या अर्थाने याची मुहूर्तमेढ १५ जुलै २००७ सालीच रोवल्या गेली. या वर्षी देखील पुण्या-मुंबई मध्ये असणारा बी.बी.ए. या अभ्यास क्रमाद्वारे लक्ष्मीनारायण गृप ऑफ इन्स्टिट्यूशन्स अॅन्ड कॉलेजेसची सुरुवात झाली. या नंतर लगेच बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., डी.बि.एम. लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल मॉडेल स्कूल , या अभ्यासक्रमासोबतच कौशल्यावर आधारित आय.टी.आय. आणि यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठ या सर्व विविध अभ्यासक्रमासह लक्ष्मीनारायण गृप मार्गक्रमण करीत आहे. या सर्वान मध्ये आज परत एक शैक्षणिक दालन खामगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यास अग्रेसर झाले आहे.
लवकरच सेवेत रुजू
बारावी सायन्स नंतर मेडिकल क्षेत्रात करीयर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. तेव्हा लवकरच लक्ष्मीनारायण फार्मसी कॉलेज या सह (सी.बी.एस.इ बोर्डची)विरपुत्र महाराणा प्रतापसिंह पब्लिक स्कूल पिंप्राळा फाटा, पिंप्रीगवळी येथे लवकरच आपल्या सेवेत रुजू होणार आहे. आपल्यासाठी नवी दिशा आणि आपल्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्यास लक्ष्मीनारायण गृप तत्पर आहे. तेव्हा अधिक माहिती साठी मो.नं. 9422919494,9960965566,9423601256 संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.