Panipuri on Google Doodle : पाणीपुरीचे नाव ऐकले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी हे भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे प्रत्येक शहरात वेगवेगळ्या नावांनी लोकांच्या जिभेची चव वाढवण्याचे काम करते. देशभरात विविध नावांनी पाणीपुरीला ओळखले जाते. कुणी त्याला गोलगप्पे म्हणतात, तर कुणी त्याला गुपचूप म्हणतात. कुठे पुचका तर कुठे पाण्याचे पताशे !
पाणी पुरी बद्दल माहिती
असे काय घडले की आपण आज पाणीपुरीचा विषय बातमीत आणला? वास्तविक, आपण पाणीपुरीचा उल्लेख यासाठी करतो आहोत की, गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून ती सर्वांसमोर आणली आहे! गुगलने बुधवारी आपल्या युजर्सना डूडलच्या माध्यमातून पाणीपुरीचा खेळ खेळण्याची संधी दिली.पाणी पुरी बद्दल माहिती देताना गुगलने याचे वर्णन चवदार पाण्याने भरलेले कुरकुरीत कवच असे केले, ज्यामध्ये बटाटे, चणे, मसाले, मिरची भरलेली आहे. सोबतच गुगलने पाणीपुरीच्याविविध चवी बद्दल सुद्धा वर्णन केले.
पाणीपुरीचा विश्वविक्रम
गुगलने पाणीपुरीच्या विश्वविक्रमाचीही माहिती दिली आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटला गोलगप्पाच्या वेगवेगळ्या चवीच्या पाण्याचा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. पाणीपुरी सर्व्ह करताना, इंदोर येथील रेस्टॉरंटने तब्बल ५१ प्रकारच्या पाणी पूरी सादर केल्या ज्याचा विश्वविक्रम झाला होता.
डूडलवर ‘पाणीपुरी गेम’
Panipuri on Google Doodle : गुगल डूडलवर पाणीपुरी गेम खेळण्यासाठी ठरलेल्या वेळेत चलाखी दाखवावी लागत होती. गेममध्ये पाणीपुरी विक्रेत्याला मदत करायची होती. वेगवेगळ्या ग्राहकांना त्यांची चव लक्षात घेऊन पाणीपुरी द्यायची होती. पाणीपुरी देताना स्क्रीनवर दिसणारे चवदार पाणी खाली दिलेल्या पर्यायातून निवडावे लागत होते. सावधानतेने खेळल्यास खेळ दीर्घकाळ टिकत होता.