दंतचिकित्सक बनून घडवा करिअर
Career After 12th : या वृत्त मालिकेत बारावी नंतर असलेल्या करिअरच्या संधी याबाबत आपण विविध माहिती जाणून घेत आहोत. समाजात शिक्षक आणि डॉक्टरांना चांगला मन सन्मान मिळत असतो. शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, तर डॉक्टर आपल्या शरीरात होणारे रोग बरे करतात आणि आजाराशी लढण्यास मदत करतात. डॉक्टरला देवाचे रूप देखील मानले हजते. लाखो तरुणांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. तुमचेही स्वप्न डॉक्टर बनण्याचे असेल तर तुम्ही डेंटिस्ट म्हणून करिअर करू शकता.गेल्या काही वर्षांत लोक त्यांच्या दातांच्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील करिअर करण्याची चांगली संधी आहे . दातांच्या संबंधित सर्व आजारांवर उपचार करण्याबरोबरच दंतवैद्य त्यांची काळजी कशी घ्यावी, आरोग्य कसे ठेवावे याची माहितीही देतात. जर तुम्हालाही डेंटिस्ट अर्थात दातांचा डॉक्टर बनायचं असेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा.
दंतचिकित्सक होण्यासाठी पात्रता
जर तुम्हालाही दंतचिकित्सक बनायचे असेल तर तुम्ही तुमचे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने १२ वी पीसीबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
ऍडमिशन कशी कराल
दंतचिकित्सक होण्यासाठी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) हा प्रमुख कोर्स मानला जातो. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. NEET मध्ये मिळालेल्या रँकनुसार तुम्हाला BDS प्रोग्राममध्ये प्रवेश मिळेल. NEET मध्ये फक्त तेच उमेदवार बसू शकतात ज्यांनी 12वी उत्तीर्ण केली आहे आणि त्यांचे किमान वय 17 वर्षे आहे.
बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS)
बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हा कोर्स करण्याआधी तुम्हाला NEET परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी लागणार आहे. बीडीएस अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे. पहिली चार वर्षे बीडीएस अभ्यासक्रमांतर्गत अभ्यास केला जातो, तर ५व्या वर्षी उमेदवाराला इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिप अनिवार्य आहे जी एक वर्ष कालावधीची आहे.
इतर अभ्यासक्रम
बीडीएस व्यतिरिक्त, दंतचिकित्सा क्षेत्रात इतर काही पीजी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत.
Oral Medicine Diagnosis & Radiology
Oral Pathology & Microbiology
Prosthodontics, Periodontics, Oral & Maxillofacial Surgery
Pedodontics and Preventive Dentistry
Certificate Course in Dental Mechanic
Diploma in Dental Mechanic
Certificate Course in Dental Hygienist
Diploma Course in Dental Assistance
पगार किती असेल
दंतचिकित्सक झाल्यानंतर, तुमचा प्रारंभिक पगार दरमहा 5 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत असू शकतो. अनुभवानुसार पगार वाढतो. याशिवाय, तुम्हाला सरकारी रुग्णालयात काम करण्याची पात्रता देखील मिळते. जर तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही स्वतःचे हॉस्पिटल किंवा क्लिनिक देखील सुरू करू शकता. दंतचिकित्सक बनून तुम्ही चांगले करिअर घडवू शकता.