Highway Hypnosis : तुम्ही जागे असता, डोळे उघडे असतात; मात्र मेंदू सक्रिय नसतो., अश्या वेळी तुम्हाला गाडीचा वेग कळत माही. समोरील वाहनाचे भान राहत आंही आणि अपघात घडतात. या प्रकाराला हायवे हिप्नोसिस म्हणतात. राज्यात हिंदूह्रदय स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तसेच एक्सप्रेस हायवेवर घडणाऱ्या अपघातांच्या मागे हायवे हिप्नोसिस हे एक कारण मानले जात आहे. आज आपण हायवे हिप्नोसिस म्हणजे काय, प्रवासात आपण हायवे हिप्नोसिस पासून काय काळजी घेतली पाहिजे याबाबत महत्वाची माहिती करून घेणार आहोत.
हायवे हिप्नोसिस म्हणजे काय?
महाराष्ट्रात हिंदूह्रदय स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रवासाकिरता खुला झाला. मात्र या महार्गावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. हा मार्ग शिरू झाल्यापासून शंभर पेक्षा जास्त अपघाताच्या घटनांची नोंद झाली असून त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले आणि जखमी झाले आहेत. या अपघातामागे अनेक करणे असून हायवे कल्पना करा की तुम्ही एखाद्या लांब आणि सुपरफास्ट महामार्गावरून प्रवास करत आहात. या मार्गावर किलोमीटर दर्शविणारे फलक किंवा मैलाचे दगड असतात. त्यावर समजा लिहिले आहे की तुम्हाला तुमच्या लोकेशनवर ( उदा. नागपूर) जायला १०० किलोमीटर अंतर बाकी आहे. थोड्यावेळाने काही अंतर कापले की तुम्हाला आणखी एक फलक किंवा दगड दिसतो त्यावर नागपूर अजून ८० किलोमीटर दूर आहे असे लिहिलेले दिसते. दरम्यान तुम्ही केलेल्या २० किलोमीटरच्या प्रवासाबाबत तुम्हाला काहीच आठवत नाही. मध्ये किती वाहने, गवे गेली, तुमचा वेग किती होता. मागील २० किमी अंतर पार करताना गाडी चालवताना तुम्ही काय केले? तुमचा डोळा लागला नाही, पण काही आठवत नाही, गाडी चालत आहे? हाच सर्व प्रकार म्हणजे हायवे हिप्नोसिस असतो.
हायवे हिप्नोसिस मध्ये नेमके काय होते ?
दर दोन ते अडीच तासांनी हायवे हिप्नोसिस तुम्हाला गाठत असतो. लांब प्रवासात हायवेवरील रिकाम्या रस्त्यावर एकसारखे वाहन चालवताना चालक तसेच गाडीतले प्रवासी संमोहित होत असतात. अश्यावेळी तुमचे मन संमोहित होऊन कंटाळा ये असतो.एकसारखा रस्ता पाहत असताना बराच वेळ तुमचे मन संमोहितअवस्थेत राहते. मेंदू ऑटोपायलट मोडमध्ये जाऊन सक्रिय राहत नाही.अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही एकसारखे कार चालवीत असता स्टीयरिंग तुमच्या हातात असते, परंतु तो आजूबाजूला जाणारी वाहने, आपल्या गाडीचा वेग, आणि आजूबाजूच्या सर्व गोष्टीचा विसर पडून तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही. एक प्रकारची तंद्री तुम्हाला लागते. माणूस झोपेतून अचानक जागे होतो, त्याप्रमाने अचानक काही घडले तर संमोहित झाल्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडता. संमोहित झाले की तंद्री , मनाचा थकवा किंवा कशावरही लक्ष केंद्रित न करणे, डोळे भारी पडणे असे सर्व प्रकार घडत असतात. जेव्हा तुम्ही या परिस्थितीत संमोहनातून बाहेर पडता, तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही बराच वेळ वाहन चालविले मात्र मागील काही आठवत नाही. जेव्हा रस्ता रिकामा असतो आणि पाहण्यासारखे काहीही नसते तेव्हा महामार्गावर गाडी चालवित्त असताना तुम्ही संमोहित होता. यावेळी मनही लवकर थकून जाते. याशिवाय मेंदू स्वतःहून अंदाज बांधू लागतो तेव्हा हायवे संमोहन होते. जेव्हा ड्रायव्हर त्याच्या डोळ्यांनी पाहतो की पुढे संपूर्ण महामार्ग रिकामा आहे, तेव्हा मेंदू हळूहळू रेटिनल फीडबॅकवर अवलंबून राहणे थांबवतो. तो मानसिक अंदाजांवर विश्वास ठेवू लागतो. यामुळे मेंदू कमी सतर्क राहतो.
संमोहन कसे नियंत्रित करावे?
अपघाताच्या बऱ्याच घटना हायवे हिप्नोसिस या आता,हायवे संमोहन कसे नियंत्रित करावे? याबदल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. हिप्नोसिस हे सुद्धा एक महत्वाचे कारण ,मानले जात आहे. यापासून वाहनचालक सुरक्षित रहावे, यासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञान वापरून उपाययोजना करणार आहे. मात्र प्रवाश्यांची सुद्धा काळजी घेतली तर हायवे हिप्नोसिस टाळता येऊ शकतो. तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. तुमचे मन तुम्हाला व्यस्त ठेवणे. त्यासाठी तुम्ही कारमध्ये गाणे सुरु ठेवा, तुमच्या सहप्रवाशाशी बोल्ट राहा. रिकाम्या हायवेवर काच खाली ठेवा. ताजी हवा तुमच्या चेहऱ्यावर येत राहिल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर लांबच्या प्रवासापूर्वी शांत झोप घ्या.झोप येऊ नये म्हणून चहा किंवा कॉफीचे सेवन करा. सतत वाहन चालवणे टाळा आणि दर दोन तासांनी एकदा ब्रेक घ्या. रीअरव्ह्यू मिरर्सवर लक्ष ठेवा.विविध प्रकारचे संगीत ऐका.दारू टाळा. संपूर्ण प्रवासात उत्तम ड्रायव्हिंगची भूमिका ठेवा. प्रवासात जास्त खाऊ नका. तुम्ही लांबच्या प्रवासाला निघाल्यास दिवसा जास्तीत जास्त अंतर कापण्याचा प्रयत्न करा. रात्री उशिराचा प्रवास टाळा. उपरोक्त बाबी जर आपण पाळल्या तर महामार्गावर होणारे Highway Hypnosis ने अपघात आपणास टाळता येणार आहेत.