Healthier gobi flower leaves
Gobi flower leaves : आपण बाजरातून फुलगोबी आणली की तिची पाने फेकून देतो. मात्र असे आता करू नका. कारण आरोग्याच्या दृष्टीने फ्लॉवरची पाने अत्यंत गुणकारी आहेत. भाजीपाला, पालेभाज्या रोजच्या आहारात आपण वापरत असतो. आज आपण गोबीची पाने कशी गुणकारी आहेत, या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम
आपल्याडे गोबी सर्वत्र मिळते. भाजीमध्ये तसेच विविध पदार्थ बनविण्यासाठी आपण गोबीचा वापर करतो. लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा गोबी हा मेनू गृहिणी बनवत असतात. ही भाजी जवळजवळ संपूर्ण भारतात मिळते. फ्लॉवरचा वापर निरनिराळ्या पदार्थांमध्ये करता येतो. अगदी साध्या भाजीपासून ते पराठे, पुलाव आणि चटकदार ‘गोबी ६५’सारख्या पदार्थांमध्येही फ्लॉवरचा वापर होतो. या पदार्थांमध्ये फ्लॉवरचा वापर करताना केवळ त्याची फुले तेवढी काढून घेतली जाऊन त्याची देठे आणि पाने टाकूनच दिली जातात. परंतु आता तसे करू नका. फ्लॉवरची पाने ही खूप पौष्टिक असून त्याचा आहारात वापर केल्यास आरोग्यास चांगले फायदे होणार आहेत. त्यामुळे गोबी सोबत फ्री आलेली पाने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत.
फ्लॉवरपेक्षा दुप्पट प्रथिने
फ्लॉवरच्या पानांमध्ये फ्लॉवरपेक्षा दुप्पट प्रमाणात प्रथिने असतात. गोबीची पाने गुणकारी असतात. या पानात स्निग्ध पदार्थांचे प्रमाणही हे गोबीच्या तुलनेत तीनपट अधिक असते. कर्बोदकांचे प्रमाणही यामध्ये फ्लॉवरपेक्षा जास्त असून, यामध्ये डाएटरी फायबरही जास्त आहे. फ्लॉवरच्या पानांमध्ये क्षारही मुबलक प्रमाणात आहेत. तसेच फ्लॉवरची पाने खाल्ल्यास ती, फ्लॉवर पुरवू शकेल त्याच्या दुप्पट प्रमाणात ऊर्जा पुरवतात. या पानांमध्ये हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे. साधारण शंभर ग्रॅम फ्लॉवरच्या पानांमध्ये ६२६ मिलीग्रॅम इतके कॅल्शियम आपल्याला मिळते. त्या मानाने फ्लॉवरमध्ये प्रतिशंभर ग्रॅममध्ये केवळ ३३ मिलीग्रॅमइतकेच कॅल्शियम आहे.
हिमोग्लोबिनमध्ये वाढ
फ्लॉवरच्या मानाने फ्लॉवरच्या पानांमध्ये फॉस्फरस अधिक असून, या पाण्यामध्ये लोहही भरपूर आहे. दर शंभर ग्रॅम फ्लॉवरच्या पानांमध्ये सुमारे चाळीस मिलीग्रॅम लोह आहे, तर हेच प्रमाण फ्लॉवरमध्ये केवळ १.२३ मिलीग्रॅम इतकेच आहे. त्यामुळे दरवेळी फ्लॉवरचा समावेश आपल्या आहारामध्ये करताना फ्लॉवरसोबत त्याची पानेही वापरावीत. फ्लॉवरच्या पानांचा वापर सब्जी बनविताना करता येतो. त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला जाणून घेता येतील. , सूप पिणे आरोग्यसाठी चांगले असते.फ्लॉवरच्या पानांपासून स्वादिष्ट सूप तसेच विविध खाद्य पदार्थ तुम्हाला बनविता येतात. ज्या लहान मुलांची वाढ अपूर्ण होत असते, किंवा ज्या मुलांना सातत्याने अशक्तपणा असतो, त्यांच्यासाठी फ्लॉवरची पाने वापरली जावीत. यामुळे त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनमध्ये वृद्धी होऊन अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
फ्लॉवरची पानाची पेस्ट बनवा
कधी कधी आवक जास्त असली की बाजारात फ्लॉवरचे दर कमी असतात. अश्यावेळी फ्लॉवरच्या पानांची पेस्ट बनवून ठेवण्यासाठी चांगली वेळ असते. फ्लॉवरच्या पानांना आधी स्वच्छ धुवून नंतर वाळवून घ्यावे. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करून काचेच्या बरणीत साठवून घ्यावी. ही पेस्ट आहारात रोज सेवन केली तरी आरोग्यासाठी त्याचा तुम्हाला चांगला फायदा ओआर आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रातांधळेपणा कमी करण्यासाठी ही पाने अतिशय उपयुक्त आहेत. फ्लॉवरच्या पानांची पावडर बनवण्यासाठी ही पाने सावलीत वाळवावीत किंवा तव्यावर कोरडीच भाजून घ्यावीत. यातील पाणी संपूर्णपणे सुकले, की मग या पानांची पावडर करून तिचा वापर करावा. बाजारात तुम्हाला फ्लॉवरची पाने मिळाली न्हाईत तर तुम्ही पेस्टचा वापर आहारात करू शकता. मात्र आता फ्लॉवर बाजरात सर्वत्र उपलब्ध असते. त्यामुळे तुम्हाला फ्लॉवरच्या पानांपासून आहारात विविध पदार्थ बनविता येतात.