Get up early in the morning; Change life : सध्या कामाचे स्वरुप बदलल्याने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत काम करणारी बरीच मंडळी आपल्याला दिसतात. कामावरून घरी उशिरा आल्याने साहजिकच झोप पूर्ण करण्यासाठी सकाळी उशिरा उठतात. वास्तविक, सकाळी लवकर उठण्याच्या सवयीने आपण अनेक महत्त्वाची कामे लवकर मार्गी लावू शकता. यातून आपली उत्पादनक्षमता वाढेल. ही चांगली सवय जोपासण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचे पथ्य पाळावे लागेल.
मिशन म्हणून स्वीकारा
जर आपल्याला झोपेतून उशिरा उठण्याची सवय मोडायची असेल तर आपण या गोष्टीकडे एक मोहिम म्हणून पाहा. यादरम्यान आपल्याला ज्या कामांना अधिक वेळ द्यावा लागतो त्या कामाची यादी तयार करावी. मात्र सकाळी अशा कामांची निवड करा, की ज्या कामात आपल्याला रस आहे. याकाळात आपण क्रिएटिव्ह काम करावे. आपले छंद विकसित करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय बाळगावी. पेपर वाचने, पेंटिंग करणे, संगीत ऐकणे, व्यायाम करणे, फिरायला जाणे यासारख्या गोष्टीतूनआपल्याला सकाळी लवकर उठण्यात रस वाटू लागेल. मित्रकंपनी असेल तर सकाळी मैदानावर खेळण्यासाठी एक टिम तयार करावी, जेणेकरून तासभर का होईना मैदानी खेळ खेळल्यास शरिराला आपोआप व्यायाम होईल.
टेक्नॉलॉजीबरोबरच मर्यादा पाळा
टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपले काम सहजपणे पार पाडू शकतो. मात्र जेव्हा सोशल मिडियाचा विचार होतो, तेव्हा त्यात आपला खूप वेळ वाया जातो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहू नये. याशिवाय आपण फोनवर अलार्म सेट करण्याऐवजी आपण अलार्म क्लॉकचा वापर करावा. त्यामुळे रात्री फोन बंद करून ठेवल्यास झोपही चांगली होऊ शकते.
रुटीन सेट करा
यशस्वी व्हायचे असेल तर डेली रुटीन सेट करणे गरजेचे आहे. अर्थात सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेच्या वेळे पर्यन्तचे नियोजन करून ठेवायला हवे. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत काम करण्याची सवय ठेऊ नये. त्यापेक्षा सकाळी लवकर उठून ताजेतवाने होऊन काम केलेले कधीही चांगले.
आपले डायट तपासा
सकस आहार ठेवल्यास आरोग्य चांगले राहते. त्यामुळे डायट प्लॅन अत्यंत महत्त्वाचा आहे. जर डायट चांगले असेल तर शरिरात ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे रात्री कमी आहार घ्यावा. याशिवाय हर्बल टीचे सेवन करावे. त्यातून आपले माइंड रिलॅक्स राहिल. आपले कामावर लक्ष केंद्रित राहिल आणि स्मरणशक्ती चांगली राहते. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्यास झोपही चांगली लागते. सकाळी उठल्यानंतर शरिरात ऊर्जा राहते.
ध्येय म्हणून निश्चित करा
सकाळी उठण्याची सवय करायची असेल तर त्यात आपल्याला रंजकता आणायची असेल तर मित्रांसमवेत सकाळी उठण्याची पैज लावा. या अॅक्टिव्हिटीमुळे आपल्याला आनंद मिळेल आणि ध्येय साध्य केल्याचे समाधानही प्राप्त होईल. लवकर उठल्यामुळे आपल्याकडे अतिरिक्त वेळही उपलब्ध असेल. याप्रमाणे गमतीशीर अॅक्टिव्हिटी केल्याने मित्रांना देखील फायदा हाऊ शकते. ज्यांना सकाळी उठणे जड जाते, त्यांच्यासाठी अशा प्रकारचे खेळ सकाळी झोपेतून लवकर उठण्यासाठी प्रेरित करतात.
झोपण्यापूर्वी ही सवय लावा
चांगली झोप तुमचे आरोग्य चांगले ठेवत असते. ही बाब लक्षात घेता आपण झोपण्या आधी ठराविक योगासने, मेडिटेशनकेले तर आपणस शांत व चांगली झोप येईल . यामुळे आपले शरीर शिथील होईल आणि आपल्याला झोप येईल, जेणेकरून सकाळी उठल्यावर आपल्याला दिवसभर थकवा जाणवणार नाही. याशिवाय झोपण्यापूर्वी आपले पाय गरम किंवा थंड पाण्याने धुतले तर पायांना आराम मिळेल. अशी कृती केल्यास झोप लवकर लागते.